अतिवृष्टीने दुधाचा तुटवडा

मुंबई - मराठवाड्यातील गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा फटका महानंद डेअरीला बसला आहे. बीड जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून त्याचा परिणाम दूध संकलनावर झाला आहे. त्यामुळे आष्टी, पाटोदा, बीड तालुका दूध संघ आणि बीड जिल्हा संघाकडून केल्या जाणार्‍या तब्बल ८० हजार लिटर दुधाचा पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे महानंद डेअरीकडे दुधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी दैनंदिन दुधाची मागणी पूर्ण करण्यासाठी खासगी दूध संस्थांकडून दूध घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. महानंद डेअरी दररोज मुंबईत सुमारे पावणेतीन लाख लिटर दूध वितरित करत असते.

पुढील बातमी
इतर बातम्या