आठवडी बाजाराचा उत्साहपूर्वक दुसरा आठवडा

दर आठवड्याप्रमाणे ग्राहकांच्या सोयीसाठी आठवडी बाजार भरवण्यात आलाय. या वेळी हा आठवडी बाजार दादरच्या राजा बढे चौक परिसरात भरवण्यात आलाय.या आठवडी बाजारला ग्राहकांचाही चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आठवडी बाजार ही संकल्पनाच मुळात शेतकऱ्यांच्या सोईची आणि त्यांच्या पुढील प्रगतीची दिशा म्हणून ग्रामीण भागातून मुंबईत आलेल्या शेतकऱ्यांना आपला ताजा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवता येत आहे.

शेतकरी ते ग्राहक थेट भेट ही आठवडी बाजारच्या निमित्त होत असल्याने हा आठवडी बाजार आठवड्यातून एकदाच नव्हे तर दोन ते तीन वेळा भरविले पाहिजेत, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. आठवडी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तू सध्या जरी रास्त दरात विकल्या जात असल्या तरी हळूहळू त्यांचे देखील दर वाढत आहेत अशी खंत काहींनी व्यक्त केली.

एकंदर आठवडी बाजार ही संकल्पना सर्वाना आवडली असून त्यातील वाढीव भाव हे बऱ्याचदा लक्षात न घेता शेतातील ताजा माल मिळणे याकडे जास्त सकारात्मक दृष्टीने पाहून ग्रहक याला सहकार्य करत आहेत. त्याचबरोबर सिने सृष्टीतील कलाकारांनी देखील या संकल्पनेला तेवढाच उत्तम प्रतिसाद दिला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या