क्या आपका नमक शुद्ध है?

मुंबई - जेवणाला मिठाशिवाय चव नाही वा मिठाशिवाय जेवणच तयार होऊ शकत नाही. पण जेवणाची चव वाढवणारे हे मीठ शुद्ध आणि आयोडीनयुक्त असणं तितकंच गरजेचं. त्यामुळे तुम्ही जे मीठ वापरता ते शुद्ध आहे का? हो, हाच प्रश्न सध्या मुंबईकरांना करावा लागणार आहे. कारण अलिकडेच अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)ने शिवदास चापसी रोड येथील मे. रावजी सॉल्ट सप्लायर कंपनीवर छापा टाकत आयोडीन विरहीत 10.5 टन मिठाचा साठा जप्त केलाय. या कारवाईतून जेवणात वापरलं जाणारं मीठ आयोडीनयुक्त, शुद्ध नसल्याची शक्यता दाट झाली आहे.

कायद्यानुसार मीठामध्ये उत्पादक स्तरावर 30 पीपीएम तर वितरण आणि किरकोळ विक्रीच्या स्तरावर 15 पीपीएम आयोडीनची मात्रा असणे बंधनकारक आहे. मात्र मीठ उत्पादक आणि वितरक या कायद्याचे उल्लंघन करत असल्याचंच वरील कारवाईतून समोर आलीय. दरम्यान एफडीएने आयोडीन विरहित मीठ जप्त करत मिठाचे चार नमुने तपासणीसाठी घेतलेत. यासंबंधीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं एफडीएच्या दक्षता विभागाकडून सांगण्यात आलेत. तर राज्यभर मिठाची तपासणी सुरू असल्याचंही स्पष्ट केले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या