भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० : भारताचा दणदणीत विजय

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० इंटरनॅशनल मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतानं सहा गडी राखून ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव केला आहे. याचबरोबर या मालिकेत ऑस्ट्रेलियाशी १-१ अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात भारताचा फिरकीपटू कुणाल पंड्यानं चार गडी बाद केले तर, विराट, धवनच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं या सामन्यात विजय मिळवला आहे.

१६४ धावांवर रोखले

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच यानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भारतानं गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला १६४ धावांवर रोखले. या सामन्यात फिरकीपटू कुणाल पंड्या यानं ४ षचकांत ३६ धावा देत, चार गडी बाद केले. तसंच, कुलदीप यादव यानं १९ धावा देत ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार फिंचची विकेट घेतली.

कोहलीची अर्धशतकी खेळी

ऑस्ट्रेलियानं उभं केलेलं १६४ धावांचं लक्ष्य पार करत असताना कर्णधार विराट कोहलीने नाबाद अर्धशतक खेळी केली. तसंच, सलामी फलंदाज रोहित शर्मा २३ धावांवर फिरकीपटू अॅडम झम्पा याच्या गोलंदाजीत बाद झाला. मात्र, विराट कोहली आणि शिखर धवनच्या भागीदारीनं भारतानं सहा गडी राखून ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव करत १-१ अशी बरोबरी साधली.

पुढील बातमी
इतर बातम्या