भारताच्या अंध क्रिकेटपटूंनी पटकावला विश्वचषक, पाकिस्तानवर केली मात

गतविजेत्या भारतीय संघाने पाकिस्तानचा २ विकेट्सनी धुव्वा उडवत पाचव्या अंध विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर अापले नाव कोरले. संयुक्त अरब अमिराती येथील शारजा स्टेडियमवर रंगलेल्या अंधांच्या अंतिम सामन्यात पाकिस्ताननं ४० षटकांत ८ बाद ३०७ धावा केल्या. त्यानंतर भारताच्या फलंदाजांनी दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत एक षटक अाणि दोन विकेट्स राखून पाकिस्तानवर मात केली अाणि दुसऱ्यांदा विश्वचषकाला गवसणी घातली.

सुनील रमेशच्या खणखणीत ९३ धावा

दीपक मलिक अाणि रंभीर यांच्या भेदक गोलंदाजीमुळे भारतीय संघाने पाकिस्तानला ३०७ धावांवर रोखले. त्यानंतर सुनील रमेशने अष्टपैलू कामगिरी करत ६७ चेंडूंत खणखणीत ९३ धावांची खेळी केली. कर्णधार अजय रेड्डीने ६० चेंडूंत ६२ धावा करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

विश्वविजेत्या संघाला फक्त अडीच लाखांचे बक्षिस

भारतीय अंध संघानं दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची करामत केली. पण भारतीय संघाला फक्त १५००० दिराम म्हणजेच २ लाख ६० हजार रुपये देऊन गौरवण्यात अाले. अंतिम सामन्यासाठी पाकिस्तानचे महान फलंदाज झहीर अब्बास अाणि भारताचे माजी क्रिकेटपटू सय्यद किरमाणी उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या