"आचरेकर सर मला प्रविणची बॅटिंग दाखवायचे", सचिनकडून कौतुक

माजी भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांच्या जीवनावर आणि खेळावर आधारित आत्मचरित्र 'झिरो फॉर फाय' पुस्तकाचे आज मुंबई MCA क्लब यथे प्रकाशन झाले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी माजी क्रिकेटपटू कर्णधार कपिल देव, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, दिलीप वेगसरकर, अजिंक्य रहाणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सोहळ्या दरम्यान माजी भारतीय क्रिकेट पटू व प्रशिक्षक प्रवीण आम्रे म्हणाले की, मी लहानाचा मोठा झालो तो सुनील गावसकर, दीलिप वेनसकर, कपिल देव यांसारख्या खेळाडूंना बघूनच. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो. त्यांचा खेळ, त्यांचा स्ट्रगल मी जवळून पाहिला आहे. त्यामुळे या सगळ्यांचा हा प्रवास माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होता. त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजतो. कारण आज ऐवढे मोठे दिग्गज माझ्या पुस्तक प्रकाशसोहळ्यासाठी आले. 

आम्ही जे शिकलो ते या पुस्तकाच्या माध्यमातून उदयनमुख क्रिकेटर्सना एक मार्गदर्शन मिळेल, असंही त्यांनी स्पष्ट केले. 

सुनील गावसकर म्हणाले, आम्ही मोठे झालो मुंबई क्रिकेटमुळे. मी परदेश दौऱ्यावर असलो आणि रणजी ट्रॉफी सुरू असेल तर पहिलं लक्ष असतं ते म्हणजे  मुंबई टीमकडे. गेली एक वर्ष मुंबई स्ट्रगल करतेय. आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा मुंबईची चँम्पियन टीम होती. लागोपाट आम्ही १६ वेळेला चँम्पियन झालो होतो. 

सचिन तेंडुलकर म्हणाले की, लहान असताना आचरेकर सर आम्हाला प्रविणची बॅटिंग दाखवायचे. प्रविणचे फुटवर्क बघ, कमिटमेंट बघ, बॉल खेळायच्या आधी काय प्रिपरेशन करतो हे सगळं आम्हाला आचरेकर सर दाखवायचे. डरबनच्या कठिण खेळपट्वीवर देखील प्रविण चांगला खेळला. त्या खेळपट्वटीवरती जाऊन अशी इनिंग खेळताना मी फार कमी जणांना पाहिलं आहे.

अजिंक्य रहाणे म्हणाला की, मी डिप्रेशनमध्ये असताना प्रविण सरांनी मला पुन्हा मैदानावर आणलं. माझ्या वाईट दिवसात सर्वात आधी ते माझ्या सोबत उभे राहिले. चांगल्या दिवसात मात्र सर्वात शेवटी त्यांचा मेसेज असतो. २०१३ नंतरची कारकिर्द ही प्रविण सरांमुळे आहे.   

झिरो फॉर फाय या पुस्तकाचे प्रकाशन चौरंगी एन्टरटेंमट प्रायवेट लिमिटेड तर्फे करण्यात आले आहे. प्रकाशक म्हणून हे काम ते मोफत करत आहेत. पुस्तक विक्रितून मिळालेले पैसे हे प्रविण आम्रे यांच्या अॅकेडमीला दिले जातील. 

प्रविण आम्रेसारख्या चाळ संस्कृतीततून आलेल्या सामान्य व्यक्तीने मेहनतीच्या जोरावर कतृत्व मिळवलं. अशा हिरोजना आम्ही कॉरपोरेशन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. प्रविण आम्रे यांचा प्रवास आम्ही जवळून पाहिला आहे. त्यांची जिद्द, मेहनत ही इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. या पुस्तकाच्या माध्यमातून एक मेंटॉरची भूमिका देण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशा भावना प्रकाशक अतुल शिरोडकर यांनी व्यक्त केल्या. 

प्रविण आम्रे हे सध्या कोचिंगमध्ये व्यस्त आहे. ते दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक आहेत. याआधी त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्येही परिक्षकाची भूमिका बजावली आहे. ते भारतातील अनेक स्टार्सचे प्रशिक्षक आहेत. एकेकाळी भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असलेला अजिंक्य रहाणे हा प्रविण आम्रे यांचा शिष्य राहिला आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या