अायपीएलमुळे बीसीसीअायची झाली 'इतकी' कमाई

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • क्रिकेट

सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (बीसीसीअाय) इंडियन प्रीमिअर लीग (अायपीएल) ही सोन्याची अंडी देणारी कोंबडीच ठरली अाहे. अायपीएलमुळे बीसीसीअायची जगभरातील ताकद अाणखीनच वाढल्यामुळे बीसीसीअायची अायसीसीवरही हुकूमत पाहायला मिळत अाहे. मात्र या अायपीएलमुळे बीसीसीअायच्या कमाईचा अाकडा वाढता वाढत चालला अाहे. ही कमाई किती अाहे, हे एेकलं तर तुम्हाला धक्काच बसेल. अायपीएल या जगातील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धेमुळे बीसीसीअायला तब्बल १२ हजार कोटींचा नफा झाल्याचे अायकर विभागाने म्हटले अाहे. विशेष म्हणजे, अायपीएलच्या स्थापनेपासून बीसीसीअायने ३५०० कोटींचा करही अायकर विभागाकडे भरला अाहे.

बीसीसीअायने भरला ३५०० कोटींचा कर

अायपीएल ही मनोरंजनपर स्पर्धा असल्यामुळे केंद्र सरकारने बीसीसीअायला करात कोणतीही सवलत दिलेली नाही. असं असलं तरी अायपीएलची कमाई मात्र विराट कोहलीच्या फटकेबाजीसह बहरत अाहे. अायकर विभागाच्या माहितीनुसार, बीसीसीअायला १२ हजार कोटींचे उत्पन्न अायपीएलमधून मिळाले अाहे. त्यातील ३० टक्के म्हणजेच ३५ हजार कोटींचा कर बीसीसीअायने भरला अाहे.

तरीही हवी करात सवलत

अायकर विभागाने बीसीसीअायकडून ३० टक्के कर अाकारला अाहे. याला अाव्हान देण्यासाठी बीसीसीअायने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली असून करात सवलत मिळावी, यासाठी बीसीसीअाय उत्सुक अाहे. बीसीसीअायनं जानेवारी महिन्यात २०१३-१४ सालासाठीचा १०० कोटी रुपये कर भरला अाहे. मात्र उर्वरित रकमेसाठी स्थगिती मिळवण्यात बीसीसीअायला यश मिळालं अाहे.

पुढील बातमी
इतर बातम्या