पुरुष आयपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या महिला इंडियन प्रीमियर लीगचं नाव वुमन्स प्रीमियर लीग असं करण्यात आले आहे. बीसीसीआय अध्यक्ष जय शाह यांनी याबाबतची माहिती दिली. त्याशिवाय महिला इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेत पाच संघ असतील, हेही स्पष्ट झाले.
यामध्ये अहमदाबाद, मुंबई, बेंगलोर, दिल्ली आणि लखनौ या पाच संघाचा समावेश असेल. या संघाचा आज लिलाव झाला. यासाठी अनेक मोठ्या कंपन्यांनी रुची दाखवली. बीसीसीआयनं ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. अदानी ग्रुपने अहमदाबादचा संघ खरेदी केला आहे तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने बेंगलोरच्या संघ विकत घेतला आहे. या संघासाठी त्यांनी मोठी रक्कम मोजली आहे.
'इतकी' लागली बोली
वुमन्स प्रीमियर लीगमधील पाच संघाचा आज लिलाव झाला. अहमदाबाद संघाला सर्वाधिक बोली लागली होती.
पुरुष आयपीएलच्या धर्तीवर बीसीसीआयने महिला IPLची सुरुवात केली आहे. वुमन्स प्रीमियर लीग याच वर्षी मार्च या महिन्यात सुरू होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चार मार्च ते 26 मार्च या कालावधीत वुमन्स प्रीमियर लीग ही स्पर्धा होणार आहे.
हेही वाचा