चेन्नई सुपर किंग्सच्या पुण्यातील सामन्यांवरही येणार संक्रांत?

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

कावेरी पाणी प्रश्नावरून चेन्नई सुपर किंग्सचे अायपीएलमधील सामने पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर हलवण्यात अाले. अाता चेन्नईच्या पुण्यातील सामन्यांवरही संक्रांत येण्याची चिन्हे दिसू लागली अाहेत. मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) स्टेडियमच्या तयारीसाठी पवना धरणातील पाणी वापरण्यास मनाई घातली अाहे. अाता मैदानाची देखभाल अाणि तयारी करण्यासाठी कुठून पाणी अाणणार, असा सवालही मुंबई उच्च न्यायालयानं एमसीएला विचारला अाहे.

हजारो लिटर पाण्याची नासाडी

लोकसत्ता मूव्हमेंट या स्वयंसेवी संस्थेने २०१६ मध्ये याविषयी जनहित याचिका दाखल केली होती. महाराष्ट्रातील अनेक गावे दुष्काळाचा सामना करत असताना पुण्यातील चेन्नईच्या अायपीएलच्या सामन्यांसाठी पवना धरणातून हजारो लीटर पाण्याची नासाडी केली जात अाहे, असे या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास अाणून दिले होते. मैदानाच्या तयारीसाठी दरदिवशी ५० हजार लिटर पाण्याची नासाडी केली जात अाहे. याप्रकरणी उत्तर देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं एमसीएला १८ एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती.

अशी झाली पुण्याची निवड

कावेरी पाणी प्रश्न तापल्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याचे बीसीसीअायने ठरवले. यासाठी बीसीसीअायने चार ठिकाणांची निवड केली. पण चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी गेली दोन वर्षे रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून या मैदानावर खेळल्यामुळे पुण्याची निवड करण्यात अाली.


हेही वाचा -

चेन्नई सुपर किंग्सचं होम ग्राउंड अाता मुंबई?

पुढील बातमी
इतर बातम्या