भारताचा आघाडीचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार वेस्ट इंडिजविरूद्धच्या वन डे मालिकेआधीच दुखापतग्रस्त झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने भुवनेश्वरऐवजी मुंबईतल्या खेळाडूला संधी देण्याचं ठरवलं आहे.
भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान येत्या रविवार (१५ डिसेंबर) पासून वन डे मालिकेला सुरूवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याआधीच भुवनेश्वर कुमार जखमी झाला आहे. त्याला हार्नियाचा त्रास होत असल्याने तो या मालिकेत खेळू शकणार नाही.