अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या १९ वर्षांखालील संघात निवड

डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर आता मुंबईच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. अखिल भारतीय १९ वर्षांखालील जेवाय लेले निमंत्रितांच्या एकदिवसीय स्पर्धेसाठी मुंबईच्या १९ वर्षांखालील संघात अर्जुनची निवड करण्यात आली आहे. १६ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून देशातील अव्वल १९ वर्षांखालील संघ जेतेपदासाठी एकमेकांशी भिडणार आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव उन्मेष खानविलकर यांनी एका पत्रकाद्वारे सुवेद पारकरच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या १९ वर्षांखालील संघाची घोषणा केली. बडोदा येथे या स्पर्धेचे सहावे पर्व रंगणार आहे.

अर्जुनची कामगिरी

भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने जुलै महिन्यात भारताच्या १९ वर्षांखालील संघातून श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले होते. श्रीलेकंविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात अर्जुनने पहिल्या डावात भारताला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात अखेरचा बळी मिळवून अर्जुनने भारताच्या विजयावर मोहोर उमटवली होती. भारताच्या १९ वर्षांखालील संघाने हा सामना एक डाव आणि २१ धावांनी जिंकला होता.

मुंबईचा संघ :

सुवेद पारकर (कर्णधार), दिव्यांश सक्सेना, करण शाह, प्रग्नेश कानपिलेवार, हर्शिल दाफेदार, अर्सलन शेख, यश साळुंखे, केसर सिंग थापा, वैभव कलमकर, अथर्व अंकोलेकर, भुषण जलवाडकर, प्रफुल देवकाते, अर्जुन तेंडुलकर, उझेर खान, बलवंत सिंग सोधा आणि सक्षम पराशर.


पुढील बातमी
इतर बातम्या