जलद गोलंदाजी ही एक कला - चामिंडा वास

जलद गोलंदाजी ही एक कला आहे. गोलंदाजी शिकताना खेळाडूने अथक परिश्रम घेतले पाहिजेत, जलद गोलंदाज होण्याची पात्रता स्वत:मध्ये निर्माण केली पाहिजे. धावण्याची चांगली पद्धत विकसीत करून आपण जलद गोलंदाजीची शैली निर्माण करून शकतो. टॅलेंट, मेहनत आणि सराव या तीन सूत्रांच्या आधारे उत्कृष्ट जलद गोलंदाज बनता येऊ शकते, असे श्रीलंकेचा माजी जलद गोलंदाज चमिंडा वास याने सांगितले. 'ज्वाला फाऊंडेशन'तर्फे आयोजित क्रिकेट प्रशिक्षणात सहभागी झालेल्या चामिंडा वासने बुधवारी क्रिकेटपटूंना मोलाच्या टीप्स दिल्या.

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपट्टू चमिंडा वास लवकरच मुंबईतील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना गोलंदाजीचे धडे देणार आहे. 'ज्वाला फाऊंडेशन'च्या माध्यमातून तो अंडर - 14,15,16 आणि 18 वयोगटातील क्रिकेटपटूंना जलद गोलंदाजीचे प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणासाठी क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली असून हे प्रशिक्षण शिबीर 17 मे ते 21 मे 2017 पर्यंत चर्नीरोड येथील पोलीस जिमखान्यावर चालणार आहे, अशी माहिती 'ज्वाला फाऊंडेशन'चे अध्यक्ष ज्वाला सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चामिंडा वास याने 2013 पासून क्रिकेट प्रशिक्षणास सुरूवात केली होती. ठिकठिकाणच्या क्रिकेटपटूंना प्रशिक्षण दिल्यानंतर सध्या तो भारतात आला आहे. ज्वाला फाऊंडेशन'च्या शिबिरात तो 5 दिवस पोलीस जिमखाना येथे खेळाडूंना जलद गोलंदाजीचे धडे देणार आहे. याआधी वसीम जाफर देखील खेळाडूंना फलंदाजीचे प्रशिक्षण देण्यास येथे आला होता.

पुढील बातमी
इतर बातम्या