भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटर बापू उर्फ रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी (Bapu nadkarni) यांचं मुंबईत वृद्धापकाळाने निधन (passed away) झालं. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे. पवईतील हिरानंदानी गार्डन येथील मुलीच्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कंजुश गोलंदाज अशी बापूंची ओळख होती.
१९५५-५६ मध्ये फिरोजशहा कोटला मैदानावर (phirojshah kotla stadium) न्यूझीलंडविरुद्धच्या (new zealand) सामन्यात बापूंनी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं होतं. बापूंनी ४१ कसोटी सामन्यांत ८८ बळी टिपले होते. सोबतच १ शतक आणि ७ अर्धशतकांसह १ हजार ४१४ धावा करत त्यांनी अष्टपैलू म्हणूनही स्वत:ला सिद्ध केलं होतं.