मुंबईच्या 'या' क्रिकेटपटूची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद

मुंबईतील सिद्धार्थ मोहिते या १९ वर्षीय क्रिकेटपटूच्या कामगिरीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद घेण्यात आली आहे. सिद्धार्थ मोहिते यानं नेटसेशनमध्ये सर्वाधिक वेळ म्हणजेच तब्बल ७२ तासांहुन अधिक वेळ फलंदाजी केल्यानं त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद घेण्यात आली आहे.

मुंबईच्या सिद्धार्थ मोहितेने सर्वाधिक काळ नेट्समध्ये फलंदाजी करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या आठवड्यात सिद्धार्थ मोहितेनं ७२ तास आणि ५ मिनिटं फलंदाजी करून विराग माने याचा २०१५ मधील ५० तासांचा विक्रम मोडीत काढला. त्यामुळं त्याच्या या कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.

यासंदर्भात सिद्धार्थनं ''मी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे. मी वेगळा आहे हे लोकांना दाखवण्याचा हा एक मार्ग होता. प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी मला माझ्या प्रयत्नात मदत केली. प्रत्येकजण मला मार्गदर्शनासाठी नकार देत होतं. मी ज्वाला सरांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी मला होकार दिला. त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला आणि मला आवश्यक ते मार्गदर्शनही केलं'', असं प्रसिद्धीपत्रकात लिहिलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या