केदार जाधवला वेध पुनरागमनाचे!

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

अायपीएलमधील पहिल्याच सामन्यात हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीला सामोरे जावे लागलेला भारताचा क्रिकेटपटू केदार जाधवच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाली अाहे. केदार जाधवला अाता भारतीय संघात कमबॅक करण्याचे वेध लागले अाहेत. मुंबई इंडियन्सविरुद्ध ७ एप्रिलला झालेल्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्याने त्याला संपूर्ण अायपीएलमधून माघार घ्यावी लागली होती.

अाॅस्ट्रेलियात शस्त्रक्रिया

केदार जाधवने अाॅस्ट्रेलियात जाऊन हॅमस्ट्रिंगवर शस्त्रक्रिया केल्याचे समजत आहे. शस्त्रक्रियेनंतर अाता हळूहळू मी सावरत अाहे. लवकरच मी माझ्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करणार अाहे, असं केदार जाधवने सांगितलं.

यो-यो टेस्टही केली

गेल्या दोन महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर असलेल्या केदार जाधवने काही दिवसांपूर्वी यो-यो टेस्टमध्येही भाग घेतल्याचं समजतं. मात्र याविषयी अधिक माहिती देण्यास केदारने नकार दिला अाहे. दुखापतीमुळे केदार जाधवचा इंग्लंड दौरा हुकला असला तरी अाता सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या अाशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात पुनरागमन करण्याचे वेध त्याला लागले अाहेत.


हेही वाचा -

केदार जाधवची अायपीएलमधून माघार

हार्दिक पंड्याला मँचेस्टर युनायटेडकडून मिळालं 'हे' गिफ्ट!


पुढील बातमी
इतर बातम्या