कसोटी पदार्पणातचं मयंक अग्रवालचे दोन नवे विक्रम

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात मयंक अग्रवालने दोन विक्रम केले आहेत. मयंक अग्रवाल ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. तसंच, ऑस्ट्रेलियामध्ये भारतातर्फे सलामीवीर म्हणून कसोटी पदार्पण करणार मयंक दुसरा खेळाडू ठरला आहे. त्यामुळं मयंकनं पदार्पणातच दोन नवे विक्रम आपल्या नावी केले आहेत.

पदार्पणात अर्धशतक

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलर्बन येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात मयंक अग्रवालने पदार्पणात नाबाद अर्धशतकी खेळी केली आहे. मयंकने १६१ चेंडूत ७६ धावा केल्या आहेत. याआधी १९४७ मध्ये दत्तू फाडकर यांनी ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पण सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर आता मयंकने अर्धशतकी खेळी केली. त्यामुळं दत्तू फाडकर यांच्यानंतर पदार्पणात अर्धशतकी खेळी करणारा मयंक अग्रवाल दुसरा खेळाडू ठरला आहे.

दुसरा सलामीवीर खेळाडू

दोन कसोटी सामन्यात अपयशी ठरलेल्या सलामी जोडीला कंटाळून भारतीय संघ व्यवस्थापनाने संघात दोन नवे बदल केले आहेत. नव्या सलामीवीरांना म्हणजे मयंक अग्रवाल आणि हनुमा विहारी यांना संघात संधी दिली. यामध्ये मयंक अग्रवाल हा ऑस्ट्रेलियामध्ये सलामीवीर म्हणून पदार्पण करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी १९४७ साली आमिर इलाही या खेळाडूनं सलामीवीर म्हणून कसोटी पदार्पण केले होते. त्यावेळी आमिर इलाहीने सिडनी येथे झालेल्या कसोटी मालिकेच्या पदार्पण सामन्याच्या दुसऱ्या डावात सलामी फलंदाजी केली होती.


हेही वाचा -

धवल कुलकर्णीचं मुंबई संघात कमबॅक


पुढील बातमी
इतर बातम्या