बाॅलर म्हणून करिअर घडवायचंय? मग एमसीएच्या या निवड चाचणीत सहभागी व्हा!

सध्या मुंबई क्रिकेटची वाताहत सुरू अाहे. रणजीसह अन्य राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मुंबईचा संघ सध्या सपाटून मार खात अाहे. यामागचं कारण म्हणजे बाॅलर्सची सुमार कामगिरी. मुंबईने चांगले फलंदाज देशाला दिले. पण हाताच्या बाेटावर मोजता येईल, इतकेच मुंबईचे गोलंदाज अांतरराष्ट्रीय स्तरावर चमकले. मुंबई क्रिकेटला चणचण भासणारी दर्जेदार गोलंदाजांची उणीव भरून काढण्यासाठी अाता मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) कंबर कसली अाहे.

१६ ते १८ अाणि १९ ते २२ वयोगटातील गोलंदाजांसाठी एमसीएने १५ ते २० जानेवारीदरम्यान गुणवत्ता शोध मोहिमेचं अायोजन केलं अाहे. ज्यांना अापल्या गोलंदाजीवर भरवसा अाहे अाणि ज्यांना बाॅलर म्हणून करिअर घडवायचं असेल तर त्यांनी एमसीएनं अायोजित केलेल्या या निवड चाचणी कार्यक्रमात जरूर सहभागी व्हावं. उच्चस्तरीय क्रिकेटसाठी गोलंदाज घडवणं, हे या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट अाहे. विशेष म्हणजे, मुंबई, पालघर अाणि ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी या निवड चाचणीचं अायोजन करण्यात येणार अाहे.

इथं होईल निवड चाचणी...

दिनांक

ठिकाण

वेळ

१५ जानेवारी

वानखेडे स्टेडियम

सकाळी १० वाजल्यापासून

१६ जानेवारी

यूनियन क्रिकेट अकादमी, वायले नगर, कल्याण

सकाळी १० वाजल्यापासून

१७ जानेवारी

सेंट्रल मैदान, ठाणे

सकाळी १० वाजल्यापासून

१८ जानेवारी

सचिन तेंडुलकर जिमखाना, कांदिवली

सकाळी १० वाजल्यापासून

१९ जानेवारी

साईनाथ क्रिकेट क्लब, विरार

सकाळी १० वाजल्यापासून

२० जानेवारी

पीडीटीएसए ग्राऊंड, एमअायडीसी, बोईसर

सकाळी १० वाजल्यापासून

 इथे करा नोंदणी...

सर्व स्थानिक गोलंदाजांना या निवड चाचणीत भाग घेता येईल. मात्र त्यासाठी सर्व गोलंदाजांनी या निवड चाचणीसाठी अापले नाव अाॅनलाइनद्वारे https://mca.crm.khelomore.com या संकेतस्थळावर नोंदवावं, असं अावाहन एमसीएनं केलं अाहे. नाव नोंदणीची प्रक्रिया १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाली अाहे.

पुढील बातमी
इतर बातम्या