हार्दिक पांड्याला कस्टमचा दणका; ५ कोटींची घड्याळं जप्त

(File Image)
(File Image)

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या नेहमी आपल्या फलंदाजी आणि वेगवेगळ्या हेअर स्टाईलमुळं चर्चेत असतो. मात्र सध्या त्याच चर्चेत असण्याचं कारण काही वेगळंच आहे. हार्दिकला चक्का कस्टमचा दणका मिळाला आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी पांड्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये होता. तिथून परत येताना कस्टम अधिकाऱ्यांनी विमानतळावर त्यानं आणलेली २ महागडी घड्याळं जप्त केली आहेत. हार्दिक पंड्याच्या या घडळ्यांची किंमत ५ कोटी रुपये इतकी आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मायदेशी परतल्यानंतर कस्टम विभागानं हार्दिक पंड्याला विमानतळावर रोखले. त्यानंतर तपासादरम्यान त्यांनी हार्दिक पंड्याकडील २ महागडी घड्याळं ताब्यात घेतली. हार्दिक पंड्यानं या घडळ्यांना कस्टममधील वस्तू म्हणून दाखवलं नव्हतं तसंच त्याच्याकडं या घडळ्यांची बिलंही नसल्याचं आढळून आल्यानं ती कस्टम विभागानं ताब्यात घेतली.

हार्दिक पंड्याला आलिशान घड्याळांची फार आवड असल्याचं सर्वांना माहिती आहे. मागील वर्षी हार्दिक पंड्याचा भाऊ क्रुणाल पांड्यासुद्धा महागडं घड्याळ आणल्याप्रकरणी कस्टमच्या कारवाईत अडकला होता. क्रुणालनं महागडी घड्याळं आणल्याचं कस्टमला कळवलं नव्हतं. त्यानंतर त्याची घड्याळं ताब्यात घेण्यात आलेली.

पुढील बातमी
इतर बातम्या