बीस्टा आणि हार्दिकची 215 धावांची विक्रमी भागिदारी

ओव्हल मैदानावर सोमवारी झालेल्या 'मित्सुई शोजी टी-20 क्रिकेट स्पर्धे'त मुंबई पोलीस सिटी रायडर्सने ठाणे मराठा संघाला सहजरित्या हरवले. मुंबई पोलीस सिटी रायडर्सचा सलामीवीर जय बीस्टा आणि हार्दिक टामोरे या दोघांनी 215 धावा करुन विक्रमी भागीदारी रचत प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडला.

जयचे शतक अवघ्या 4 धावांनी हुकले. 96 धावा करताना जयने 14 चौकार आणि 4 षटकार खेचले. हार्दिकने मात्र आपले शतक यशस्वीरित्या पूर्ण केले. हार्दिकने 113 धावा करताना 10 षटकारांसह 9 चौकार ठोकले. या दोघांच्या 215 धावांच्या भागिदारीच्या जोरावर सिटी रायडर्सने 283 धावांचे आव्हान ठाणे मराठा संघापुढे ठेवले.

या आव्हानाचा पाठलाग करण्यास मैदानात उतरलेल्या ठाणे मराठा संघाला 101 धावांपर्यंतच मजल मारता आली. सिटी रायडर्सने त्यांचा 181 धावांनी पराभव केला.

पुढील बातमी
इतर बातम्या