प्रवीण अमरे यांचा एमसीएच्या सदस्यपदाचा राजीनामा

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • क्रिकेट

भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्यपदाचा राजीनामा दिला अाहे. कोणत्या वादातून त्यांनी हा राजीनामा दिला नसून अायपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स फ्रँचायझीसाठी टॅलेंट हंटचे प्रमुख म्हणून नेमणूक झाल्यानंतर अमरे यांनी हा राजीनामा दिला अाहे. त्यासंदर्भात अमरे यांनी १ फेब्रुवारी रोजी एमसीएचे अध्यक्ष अाशिष शेलार यांना पत्र लिहून अापल्या राजीनाम्याचा निर्णय कळवला अाहे. न्यायाधीश लोढा समितीच्या शिफारशींनुसार, परस्पर हितसंबंध टाळण्यासाठी अापण हा निर्णय घेतल्याचे प्रवीण अमरे यांनी या पत्रात म्हटलं अाहे.

एक क्रिकेट प्रशासक या नात्याने उदात्त असा पायंडा अाम्ही पाडत असतो. अनेकांनी त्याचे अनुकरण करावे, असा अामचा हेतू असतो. त्याच मार्गावरून माझीही वाटचाल सुरू अाहे. माझ्या व्यावसायिक बांधीलकीसाठी मी एमसीएच्या सदस्यपदाचा राजीनामा देत अाहे.

- प्रवीण अमरे, माजी क्रिकेटपटू

एमसीएला दिल्या शुभेच्छा

उत्तम प्रशासनासाठी प्रवीण अमरे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला शुभेच्छा दिल्या अाहेत. खेळाच्या भवितव्यासाठी जर माझी गरज भासली तर सल्ला देण्यासाठी मी कायम उपलब्ध असेन. अमरे यांनी १९९१ ते १९९९ या काळात ११ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले अाहे. अमरे यांचा राजीनामा पुढील अाठवड्यात एमसीएच्या मॅनेजिंक कमिटीसमोर ठेवण्यात येणार असून त्याचा राजीनामा स्वीकारला जाईल, असं एमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

अमरे पत्रात काय म्हणाले, ते वाचा...

पुढील बातमी
इतर बातम्या