आर. अश्विन ठरला 'सीएट आतंरराष्ट्रीय खेळाडू'

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काहीतरी नवीन घेऊन उतरणार असल्याचा निर्धार भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज आर. आश्विन याने व्यक्त केला. सीएट लिमिटेड कंपनीद्वारे 'सीएट रेंटींग इंटरनॅशनल' अवॉर्डचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी तो बोलत होता. यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यश मिळवलेल्या खेळाडूंना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आलं. या वर्षी 99 विकेट आणि 9 वेळा पाच विकेट बाद करण्याचा पराक्रम करणाऱ्या आर. अश्विन याची 'सीएट आतंरराष्ट्रीय' खेळाडू म्हणून घोषणा करण्यात आली. 

तसेच युवा प्रतिभेला उत्तेजना देण्यासाठी आणि सन्मानित करण्यासाठी भारताच्या शुभम गिल याला भारताच्या 19 वर्षांखालील संघाच्या इंग्लंड विरुद्धच्या विजयातील महत्वपूर्ण कामगिरीबद्दल 'सीएट यंग प्लेअर ऑफ द इअर'चा पुरस्कार देण्यात आला. 1995 पासून 'सीएट'कडून हे पुरस्कार दिले जातात. याआधी 'सीएट क्रिकेट काऊंसलिंगद्वारे मानांकित करण्यात येणाऱ्या 'सीएट इंटरनॅशनल क्रिकेट रेटिंग्ज'द्वारे आतंरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना सन्मानित करण्यात येते.

घरच्या मैदानावर 13 टेस्ट सामने खेळल्यानंतर मला आयपीएलमध्ये आराम करण्याचा सल्ला दिला होता. मी चॅम्पियनस ट्रॉफीमध्ये काहीतरी नवीन करू शकतो. न्युझीलंड आणि बांग्लादेश सोबतच्या दोन सराव सामन्यात मला माझी तयारी कशी अाहे याचे संकेत मिळतील. मी संघासाठी काहीतरी नवीन आणतो आणि नवीन देतो. 30 यार्ड वर्तुळाचे 4 क्षेत्ररक्षक तसेच दोन नवीन चेंडू, हे नियम प्रत्येक गोलंदाजास विचार करण्यास भाग पाडतात. आयपीएल ही भारतीय खेळाडुसांठी नव्हे तर परदेशी खेळाडुसांठी देखील फायद्याची ठरली आहे. गेल्यावर्षी मला 'इंटरनॅशनल बॉलर ऑफ द इयर'चा पुरस्कार मिळाला होता. आता सीएटकडून आतंराष्ट्रीय खेळाडू म्हणून सन्मानीत करण्यात आले आहे.

आर.आश्विन - भारतीय फिरकी गोलंदाज

पुढील बातमी
इतर बातम्या