शिखर-रोहितचा ४००० धावांचा विक्रमी चौकार

धडाकेबाज खेळी करत प्रतिस्पर्धी संघांवर दडपण आणणाऱ्या शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीवीर जोडीनं आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शिखर-रोहित जोडीनं पहिल्या विकेटसाठी ४७ धावांची भागिदारी केली. या भागिदारीमुळं या जोडीच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली आहे. शिखर-रोहितने सलामीला येत एकत्रित ४००० धावांचा पल्ला पार केला आहे. हा टप्पा पार करणारी ही जगातील चौथ्या क्रमांकाची सलामीवीरांची जोडी ठरली आहे. तसंच, भारताकडून सर्वोत्कृष्ट भागिदारी करणारी ही जोडी दुसऱ्या स्थानावर आहे

सलामीवीर जोडी

६ जून २०१३ पासून शिखर-रोहित भारतासाठी सलामीवीर म्हणून फलंदाजी करत आहेत. या जोडीनं ४५.३९ च्या सरासरीनं ९१ डावांत फलंदाजी करत ४०३४ धावा केल्या आहेत. यामध्ये १३ शतकी आणि १३ अर्धशतकी भागिदारीचा समावेश आहे. दरम्यान, याआधी ४००० धावांचा पल्ला सचिन तेंडुलकर - सौरव गांगुली (६६०९), ऍडम गिलख्रिस्ट-मॅथ्यू हेडन (५३७२) आणि गाॅर्डन ग्रिनिज आणि डेसमंड हाईन्स (५१५०) या सलामीवीरांच्या जोडीने पार केला आहे.

सर्वाधिक षटकारांचा विक्रम

त्याचप्रमाणं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा 'हिट मॅन' रोहित शर्माने एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमाची नोंद केली आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध ५३ आंतरराष्ट्रीय सामन्यात तब्बल ८९ षटकार मारण्याचा विक्रम रोहितच्या नावे आहे. याआधी हा विक्रम ख्रीस गेलनं केला होता. गेलनं इंग्लंड विरुद्ध ८८ षटकार मारले आहेत. तिसऱ्या स्थानावरील शाहिद आफ्रिदीने श्रीलंका संघाविरुद्ध ८६ षटकार मारले आहेत.


हेही वाचा -

ऑस्ट्रेलियावर मात करत भारताने दिला विजयाचा तीळगूळ


पुढील बातमी
इतर बातम्या