मुंबईकर रोहित शर्माचं अाफ्रिकेतलं पहिलंवहिलं शतक

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • क्रिकेट

अाज दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या वनडे सामन्यात बऱ्याच कालावधीनंतर मुंबईच्या तीन फलंदाजांचा नजराणा पाहण्याची संधी क्रिकेटशौकिनांना मिळाली. दक्षिण अाफ्रिकेविरुद्धच्या या दौऱ्यात तुफान फाॅर्मात असलेला विराट कोहली अपयशी ठरल्यानंतर मुंबईकर रोहित शर्माने मात्र अाफ्रिकन गोलंदाजांची पिसं काढत अापल्या कारकीर्दीतलं १७ वं शतक साजरं केलं. विशेष म्हणजे, परदेशात दमदार कामगिरी करणाऱ्या रोहित शर्माचं हे दक्षिण अाफ्रिकेतलं पहिलंवहिलं शतक ठरलं.

रोहित-विराटची शतकी भागीदारी

शिखर धवनने अाक्रमक सुरुवात करत भारताच्या डावाची पायाभरणी केली. पण २३ चेंडूंत ८ चौकार लगावणारा धवन ३४ धावांवर माघारी परतल्यानंतर रोहित शर्मा अाणि विराट कोहली यांनी भारताला सुस्थितीत अाणून ठेवले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी रचली. कोहली ३६ धावांवर धावचीत झाल्यानंतर रोहितने एक बाजू लावून धरली. त्याने १०७व्या चेंडूवर स्क्वेअर लेगला एक धाव घेत अापलं शतक साजरं केलं. मात्र रोहितची खेळी लुंगी एनगिडीने ११ चौकार अाणि ४ षटकारांसह ११५ धावांवर संपुष्टात अाणली.

पुढील बातमी
इतर बातम्या