खेळाडूंच्या वेतनवाढीला सौरव गांगुलीचं समर्थन

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानं संघातील सहकाऱ्यांच्या पगारवाढीची मागणी केली होती. आता माजी कर्णधार सौरव गांगुलीनं या वेतनवाढीचं समर्थन करत 'वेतनात वाढ झालीच पाहिजे, बीसीसीआयच्या वाढत्या प्रतिष्ठेला खेळांडूचंदेखील श्रेय आहे. भारतीय संघाचा आताचा कर्णधार विराट कोहली आणि महेंद्र सिंह धोनी यांनी केलेली वेतन वाढीची मागणी गुरुवारी समिती प्रशासनानं स्वीकारली आहे'. असं गागुंलीनं मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

पुढे काय म्हणाला गांगुली

'नक्कीच खेळाडूंना पैसे मिळाले पाहीजे. बोर्ड एवढे पैस कमवत आहे. मग खेळाडूंचीदेखील पगारवाढ झालीच पाहीजे. जेव्हा विराट कोहली खेळतो, तेव्हा संपूर्ण भारत त्याला बघतो. क्रिकेट खेळाडूंकडे लक्ष द्यायला हवं. कारण त्यांचं करियर छोटं आहे', असं माजी गोलंदाज गांगुलीनं सांगितलं.

'खेळाडूंकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण त्यांचे करियर १५ वर्षांचे असते. जास्तीत जास्त खेळाडू १५ वर्षांपर्यंत खेळू शकतो. वेतनवाढीला माझं समर्थन आहे. आज ज्या पद्घतीनं खेळाडूंवर लक्ष ठेवलं जात आहे ते खूप छान आहे. जेव्हा १९९१ मध्ये खेळलो तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण दौऱ्याचं मला एकूण ३० हजार रुपये मिळाले होते. जेव्हा २०१३ मध्ये करियर संपलं तेव्हा खूप मोठा बदल झाला होता' असं सौरव गांगुलीनं बोलताना सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या