शिवाजीपार्क जिमखान्यातर्फे विजय मांजरेकर-रमाकांत देसाई स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 12 मे ते 14 मे या कालावधीत होणार आहे. याच जिमखान्याने आजपर्यंत अनेक दिग्गज खेळाडू दिले आहेत. त्यातीलच विजय मांजरेकर आणि रमाकांत देसाई हे दोन क्रिकेटपटू. त्यांच्या नावे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून, यापूर्वी विजय मांजरेकर एकेरी आणि रमाकांत देसाई दुहेरी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जात होते. त्यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचाही समावेश होता.