कसोटी क्रमवारीत विराट पुन्हा अव्वल

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि विराट कोहलीमध्ये नंबर वनसाठी चुरस होती.  विराटने बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली. या कामगिरीमुळे त्याने ९२८ अंकासह अव्वलस्थानी पुन्हा एकदा झेप घेतली.

आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत स्टीव्ह स्मिथ ९२३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्मिथला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. याचा परिणाम त्याच्या रँकिंगवर झाला. दुसरीकडे, कोहलीने बांग्लादेशविरूद्ध चांगली कामगिरी केली. 

नुकतेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका संपल्या. या मालिकेनंतर बुधवारी आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली. कसोटी क्रमवारीत पहिल्या दहा फलंदाजांमध्ये भारताचा विराट कोहली व्यतिरिक्त चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर आणि अजिंक्य रहाणे सहाव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ८७७ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. 

फलंदाजाचे नाव         अंक

विराट कोहली                ९२८ 

स्टिव स्मिथ                  ९२३

केन विल्यमसन              ८७७

चेतेश्वर पुजारा               ७९१ 

डेव्हिड वॉर्नर                  ७६४

अजिंक्य रहाणे               ७५९

ज्यो रूट                        ७५२

मार्नस लॅब्यूशाने              ७३१

हेन्री निकोलस                ७२६


हेही वाचा  -

रहाणे, पृथ्वी शॉ मुंबईच्या संघात


पुढील बातमी
इतर बातम्या