दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कॅगिसो रबाडाची अायपीएलमधून माघार

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट

दक्षिण अाफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा याने पाठीच्या दुखापतीमुळे अायपीएलमधून माघार घेतल्याने त्याच्या अायपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघाला मोठा धक्का बसला अाहे. अाॅस्ट्रेलियाविरुद्ध बिडवेस्ट वाँडरर्स स्टेडियमवर सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात त्याला ही दुखापत झाली. त्यामुळे यापुढे तो तीन महिने क्रिकेट खेळू शकणार नाही, असं दक्षिण अाफ्रिका टीमचे व्यवस्थापक डाॅ. मोहम्मद मूसाजी यांनी स्पष्ट केलं अाहे.

अाॅस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त फाॅर्ममध्ये

नुकत्याच झालेल्या अाॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दक्षिण अाफ्रिकेने ३-१ असा एेतिहासिक विजय मिळवला. या विजयात कॅगिसो रबाडाने २३ विकेट्स मिळवत मोलाचे योगदान दिले होते. अायसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी असलेला रबाडा सध्या जबरदस्त फाॅर्ममध्ये अाहे.

दिल्ली डेअरडेव्हिल्सला फटका

रबाडा चांगल्या फाॅर्ममध्ये असल्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या वेगवान गोलंदाजीची धुरा न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टसह रबाडावर होती. मात्र अाता रबाडा अनुपलब्ध असल्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सला मोठा फटका बसला अाहे.


हेही वाचा -

अायपीएलच्या उद्घाटनाविषयी सर्व माहिती इथे वाचा!

वानखेडेवरील मुंबई इंडियन्सच्या सामन्यांना पाणीकपातीचा फटका?

पुढील बातमी
इतर बातम्या