इशान किशनने वाजवली कोलकाताची ‘पुंगी’, मुंबई इंडियन्सचा १०२ धावांनी विजय

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रिकेट
बाद फेरीत स्थान मिळवण्यासाठी ‘करो या मरो’ अशी स्थिती येऊन ठेपल्यानंतर मुंबई इंडियन्स संघ आता खडबडून जागा झाला आहे. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत सुरुवात काहीशी संथ झाल्यानंतर युवा फलंदाज इशान किशनने कोलकाताच्या गोलंदाजांची अक्षरश: पुंगी वाजवली. त्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीनुळे मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सवर १०२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने आता गुणतालिकेत १० गुणांसह चौथ्या स्थानी झेप घेतली असून कोलकाताला पाचव्या स्थानी फेकले आहे.

सूर्यकुमारचा सूर्य पुन्हा तळपला

पुढील बातमी
इतर बातम्या