अायपीएलच्या लिलावात अजिंक्य रहाणेला २ कोटींची बेस प्राइज, ५७८ खेळाडूंवर लागणार बोली

इंडियन प्रीमिअर लीगच्या (अायपीएल) ११व्या पर्वासाठी अाता रिटेन केलेल्या खेळाडूंव्यतिरिक्त सर्व खेळाडूंचा लिलाव होणार अाहे. बंगळुरूमध्ये २७ अाणि २८ जानेवारी रोजी होणाऱ्या अायपीएलच्या लिलावात भारताच्या १६ अव्वल खेळाडूंसह तब्बल ५७८ खेळाडूंवर बोली लागणार अाहे. अाठ फ्रँचायझींनी १८ खेळाडू रिटेन ठेवले असून १८२ खेळाडूंना अाठ संघात स्थान मिळणार अाहे. मुंबईकर अजिंक्य रहाणेसाठी २ कोटी रुपयांची बेस प्राइज ठेवण्यात अाली अाहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चमक दाखविणाऱ्या मुंबईकर पृथ्वी शाॅ याच्यावरही यंदाच्या अायपीएलमध्ये प्रथमच बोली लागणार अाहे.

तब्बल ३६० भारतीय खेळाडूंवर बोली

अायपीएलच्या या लिलावात ६२ अव्वल खेळाडू अाणि २९८ होतकरू खेळाडूंचा समावेश असेल तर परदेशातील १८२ अव्वल क्रिकेटपटूंवर अाणि ३४ होतकरू खेळाडूंवर बोली लागेल. त्यात असोसिएट राष्ट्रांमधील २ क्रिकेटपटूंचाही समावेश असेल.

अव्वल खेळाडूंना २ कोटींची बेस प्राइज

मुंबईकर अजिंक्य रहाणेसह, गौतम गंभीर, अार. अश्विन, शिखर धवन, हरभजन सिंग, युवराज सिंग, ख्रिस गेल, बेन स्टोक्स, केन विल्यम्सन, ग्लेन मॅक्सवेल, जो रूट, मिचेल स्टार्क, फॅफ डू प्लेसिस, ड्वेन ब्राव्हो, किराॅन पोलार्ड, शाकिब हसन या खेळाडूंसाठी तसेच मुरली विजय, लोकेश राहुल, केदार जाधव, दिनेश कार्तिक, राॅबिन उथप्पा, युझवेंद्र चहल अाणि कर्ण शर्मा यांच्यासाठी २ कोटींची बेस प्राइज ठेवण्यात अाली अाहे.

पुढील बातमी
इतर बातम्या