अवघ्या १९ वर्षांचा पृथ्वी झाला कोट्यधीश, दिल्ली डेअरडेव्हिल्सची १.२ कोटींची बोली

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • क्रिकेट

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरशी तुलना केला गेलेला अाणि भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार मुंबईकर पृथ्वी शाॅ पहिल्यांदाच अायपीएलच्या लिलावात सामील झाला. पृथ्वी शाॅमधील अफाट गुणवत्ता अोळखून दिल्ली डेअरडेव्हिल्सनं पृथ्वी शाॅ याला १.२ कोटी रुपयांना विकत घेतलं अाहे. सांताक्रूझ इथं एका भाड्याच्या खोलीत राहणारा पृथ्वी शाॅ अाता कोट्यधीश झाला अाहे. 

पृथ्वी शाॅच्या नेतृत्वाखालील भारतानं U-19 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला अाहे. अाता पृथ्वी शाॅ भारताला विश्वचषक जिंकून देतो का, याची उत्सुकता सर्वांना लागली अाहे.

मुंबई इंडियन्स संघात मुंबईकर खेळाडू

बंगळुरू इथं सुरू असलेल्या अायपीएलच्या ११व्या पर्वाच्या लिलावात मुंबई इंडियन्स मुंबईकर खेळाडूंवर बोली लावणार का, याची उत्सुकता होती. अखेर मुंबई इंडियन्सने मुंबई रणजी संघातील सूर्यकुमार यादवला करारबद्ध केलं. मुंबईनं सूर्यकुमारवर ३.२ कोटींची बोली लावली. मुंबईच्या सिद्धेश लाडला मात्र कुणीही विकत घेतलं नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या