परदेशातून आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू, पोलिसांची 13 पथक सज्ज

 
संपूर्ण देशांत कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले असुन, याची दहशत घेतलेले अनेक नागरीक वैद्यकीय्ा तपासणीसाठी पुढे येत नाहीत तर दुसरीकडे परदेशातुन आलेले नागरीक हॉटेल अथवा घरी लपुण बसल्याने, अशा नागरीकांच्या शोधसाठी मुंबई पोलिसांनी 13 पथकांची स्थापना केली आहे. हे पथक केवळ संशयीत कोरोना रुग्ण तसेच परदेशातुन आलेल्या नागरीकांचा शोध घेणार आहेत.
 तसेच हे पथक प्रत्येक विभाग आणि परिमंडळामध्ये कार्यरत राहणार आहे. विशेष करुन आत्तापर्यंत परदेशातुन आलेल्या नागरीकांची सर्व यादी विमानतळ प्रशासनाकडुन घेण्यात आली आहे.

परराज्यातुन समुद्री मार्गााने आलेल्या प्रवाशांची यादी ताब्यात घेत या पथकाने तपासण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे राज्यात संचारबंदी असताना देखील याचे सर्रासपणे उल्लंघण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर मुंबई पोलीस आयुक्तांनी शहरात 188 अन्वयेअटकेची कारवाई करण्याचे आदेश पोलीस दलाला दिले आहेत. आत्तापर्यंत जगभरात 13 हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रात 24 तासांत तब्बल15 रुग्ण वाढले आहेत.

 महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली आहे. मागील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे परदेशातुन आलेले अनेक नागरीक हे हॉटेल्स, लॉज तसेच घरात लपुण बसले आहेत. ते अद्याप प्राथमिक तपासणीसाठी पुढे आलेले नाहीत. यामुळे पोलिसांनी असा नागरिकांच्या शोधासाठी या 13 पथकांची स्थापना केली आहे. तसेच ज्यांना 31 मार्च पर्यंत  घरात विलिगीकरण  केले आहे. असे संशयीत देखील उघडपणे फिरत असल्याने, त्यांच्यावर देखील या पथकाने करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. हे पथक स्थानीक पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली काम करणार असुन, याचा प्रत्येक अहवाल ते पोलीस उपायुक्तांनी देतील
पुढील बातमी
इतर बातम्या