INS बेटवा युद्धनौकेचा अपघात, 2 नौसैनिकांचा मृत्यू

मुंबई - नेव्हल डॉकयार्डमध्ये आयएनएस बेटवा या युद्धनौकेच्या अपघातात दोघा नौसैनिकांचा मृत्यू झालाय. एन. के. राय आणि आशुतोष पांडे अशी या नौसैनिकांची नावं आहेत. तर कित्येक जण जखमी झालेत. नौदलाकडून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. नेव्हल डॉकयार्डमध्ये आयएनएस बेटवाची दुरुस्थी सुरू होती. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास या युद्धनौकेला गोदीतून बाहेर काढत येत होते. त्यावेळी तांत्रिक बिघाड झाला आणि अचानक युद्धनौका पाण्यात कलंडली. युद्धनौकेवर असलेले नौसैनिक आणि इतर कर्मचारी समुद्रात पडले. तात्काळ बुडालेल्या नौसैनिकांना वाचवण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. "१४ नौसैनिकांना वाचवण्यात यश आलंय. तर दोन नौसैनिकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला," अशी माहिती नेव्हीचे प्रवक्ता राहुल सिन्हा यांनी दिली.

युद्धनौकेला गोदीतून बाहेर काढत असताना टीपिंग दरम्यान डॉक ब्लॉक्स मेकॅनिझम बिघडल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जातंय. अश्या प्रकारची दुर्घटना या आधी नौदलात झालेली नाहीये. त्यामुळे कलंडलेल्या युद्धनौकेला सरळ करायचं मोठं आव्हान नेव्ही समोर आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या