'व्हॅलेंटाईन डे' ला गेले चौपाटीवर, पोहोचले पोलिस ठाण्यात

समुद्रकिनारी एखादं कपल दिसलं की, तृतीयपंथी किंवा चणे-शेंगदाणेे विकणारे संधी साधून मधमाशांप्रमाणे त्यांच्या आजूबाजूला पैशांसाठी घोंगावू लागतात. प्रेम करताना एकांत मिळावा म्हणून प्रियकरही पटकन खिशातून पैसे काढून त्यांना पळवतो. मात्र जोडप्यांच्या भाबडेपणाचा काहीजण गैरफायदाही घेतात. नुकताच असा प्रकार वरळी सी फेस इथं घडला असून व्हॅलेंटाईन डे निमित्त समुद्रकिनारी बसलेल्या जोडप्याचे फोटो काढून ते फोटो घरातल्यांना दाखवण्याची धमकी देत दोन महिलांनी त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. मात्र या हुशार जोडप्याने न घाबरता त्यांना पोलिस चौकीत घेऊन जात वरळी पोलिसांच्या ताब्यात दिलं.

पुढील बातमी
इतर बातम्या