गुंगीचं औषध पाजून तरुणीवर बलात्कार, गुजरातच्या व्यावसायिकाला अटक

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

मुंबईतल्या प्रसिद्ध आॅर्केस्ट्रा सिंगरला गुंगीचं औषध पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक बाब सांताक्रूझमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुजरातमधील मोठा व्यावसायिक लालचंद मिस्त्रीलाल तिवारी (२२) याला पोलिसांनी अटक केली आहे. कहर म्हणजे या व्यावसायिकाने अत्याचाराचा व्हिडिओ काढून तो मुलीसह स्वतः च्या मित्रांना पाठवल्याचं तपासात पुढं आलं आहे

काय आहे प्रकरण?

गुजतरातच्या सूरतमध्ये राहणारा लालचंद तिवारी तेथील सोने-चांदीचा मोठा व्यापारी आहे. त्याची मुंबईतील फोर्टच्या एका प्रसिद्ध बारमधील आॅर्केस्ट्रात काम करणाऱ्या २२ वर्षीय पीडित तरुणीची ८ महिन्यापूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर दोघेही फोनवरून एकमेकांच्या संपर्कात होते.

ज्यूसमधून औषध पाजलं

१८ फेब्रुवारीला तिवारीने पीडित तरुणीला सांताक्रूझच्या व्हि.पी. रोड येथील गेस्ट हाऊसवर भेटायला बोलावलं होतं. त्यावेळी तिवारीने पीडितेजवळ शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र तरुणीने शरीरसंबधासाठी नकार दिला. त्यावेळी आरोपीने पीडितेसाठी मोसंबीचा ज्यूस मागवून त्यात तिची नजर चुकवून गुंगीचं औषध टाकलं.

व्हिडिओ काढला

ज्यूस प्यायल्यानंतर पीडितेला चक्कर येऊ लागली. बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या तरुणीवर अत्याचार करत तिवारीने तिचा व्हिडिओ काढला. तरुणीला शुद्ध आल्यावर आपल्यावर बलात्कार झाल्याचं या तरूणीच्या लक्षात आलं. त्यावेळी डोकं दुखत असल्यामुळे पीडितेने आरोपीला घरी सोडण्यास सांगितलं.

सापळा रचून अटक

मात्र त्यानंतर आरोपीने २८ मार्चला या तरुणीची मावशी व एका मित्राला तरुणीचे नग्न छायाचित्र व चित्रफीत पाठवले. याबाबतची माहिती मिळाल्यावर पीडित तरुणीने व्हि.पी. रोड पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी बलात्कार व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर सांताक्रूझ विमानतळाजवळ सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केली.


हेही वाचा-

बहिणचं निघाली वैरिण, अश्लिल क्लिप काढून देहविक्रीत ढकललं

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अत्याचाराची बनवली व्हिडिओ क्लिप


पुढील बातमी
इतर बातम्या