26/11 attack : मुंबई हल्ल्यानंतर पोलिसांना मिळालेल्या अद्ययावत शस्त्रे आणि यंत्रांची वैशिष्ट्य

मुंबईत २६/११ दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पुलाखालून बरेच पाणी निघून गेले आहे. या हल्यानंतर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अनेक उपाय योजना केल्या, पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रांसह अद्यावत यंत्रणा ही उपलब्ध करून दिला. मात्र सरकारची खरी कसोटीही या यंत्रणाची काळजी घेण्यावर अवलंबून आहे. या शस्त्र आणि यंत्रणांची वेळोवेळी काळजी न घेतल्यास ते देखील या पूर्वी आणलेल्या यंत्रणांप्रमाणे धूळखात पडू शकतात. 

मार्कसॅन -३६

देशाच्या पहिल्या सशक्त  बुलेटप्रूव्ह गाड्या मार्कस्मन गाड्या पोलिस दलात दाखल झाल्या. अगदी छोट्या बंदुकी अगदी ग्रेनाईडपर्यंतच्या घातक हल्ल्यात हे वाहन सुरूक्षा देऊ शकते. दहशतवादापासून अगदी गँगवॉरच्या परिस्थितीतही हे वापर सुरक्षा देऊ शकते. या वाहनातून अगदी एके-४७ च्या गोळीबारापासूनही वाचता येऊ शकते. सुरक्षा व हल्ला या दोनही प्रकारांसाठी या गाडीचा वापर होऊ शकतो. त्यात एकावेळेला ६ पोलिस कर्मचारी बसण्याची सुविधा आहे. शहरातील प्रत्येक प्रादेशिक परिमंडळसह काही निवडक एसीपींच्या अंतर्गत हे वाहन पुरवण्या आले आहे.  र्स्मान वाहने महिंद्र डिफेन्स सिस्टम (एमडीएस) द्वारे तयार केली जातात. या प्रत्येक वाहनाची किंमत प्रत्येकी ३८ लाख रुपये आहे.

कॉम्बॅट्स - १३

दहशतवाद्यांकडील सुसज्ज व अद्ययावत शस्त्रांसासून हे वाहन सुरक्षा देऊ शकते. पाच प्रादेशिक परिमंडळ व काही निवडक विभागांकडे ही वाहने देण्यात आली आहेत. त्यात ग्रेनेड लाँजर सारखी सुसज्ज यंत्रणा आहे. ही वाहने चालवण्यासाठी विशेष प्रशिक्षीत पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

रक्षक -४

रक्षक हे देखील बुलेटप्रुफ वाहन असून त्यात कोणत्याही हल्ल्यामध्ये शत्रुशी दोन हात करण्याची क्षमता आहे. रक्षक प्रादेशिक परिमंडळ कार्यालयांमध्ये तैनांत करण्यात आली आहेत. त्यात सुसज्ज हस्त्यारे असून ती चालवण्यासाठी पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात येते. पाच ते सात मिनिटात घटनास्थळी पोहोचण्याच्या दृष्टीने ही वापने नेहमी सज्ज असतात.

महाराक्षक -०४

काउंटर आक्रमण उघडण्यासाठी 'महारक्षक' हे खुले छप्पर असलेल्या आर्मर्ड ग्रुप कॅरिअर जम्बो व्हॅन आहेत. हे कमांडो आपल्या तळांवरुन सशस्त्र दहशतवाद्यांकडून गोळीबार होत असलेल्या ठिकाणी नेण्यास उत्तम आहे. सहा कमांडो या वाहनातून चार वेगळ्या दिशेने गोळीबार करू शकतात.

रॅपिड इंटरव्हेक्शन वाहन - ०५

रॅपिड इंटरव्हेक्शन व्हेइकल हे विशेष पोलिस ठाण्यांसाठी डिझाईन केलेले वाहन आहे. जे दहशतवादी हल्ला अथवा दंग्याच्या ठिकाणांहून नागरीकांना सुरक्षीत बाहेर काढण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावू शकते अश्रुधुर सोडणारे लॉचर या वाहनाच्या समोरच्या बाजूला बसवण्यात आले आहे.

एम्फीबियन मरीन क्राफ्ट्स -१९ (२ नॉन-फंक्शनल)

अम्फीबियन बंद रस्ता वाहने सर्व दलदलीच्या जमिनीत जाऊ शकतात किंवा जेथे तेथे पाणी आहे तेथे ते जाऊ शकते. हे दहशतवादी हल्ल्यांविरूद्ध वापरले जाऊ शकते किंवा अश्या लोकांना वाचवण्यासाठी वापरता येऊ शकते. ती पाण्यात फ्लोट करू शकते, जमिनीवर जाऊ शकते, टार रोड किंवा दलदलीचा प्रदेश किंवा खडतर जमिनीवर वापरता येईल. यात ४ सॅन्डर्सच्या ३२ हॉर्स पॉवर इंजिन आहेत. तो पाण्यात हलू शकतो आणि अनुक्रमे दर तास ५ आणि ३० नॉटिकल मैल प्रति ताशी वेगाने जाऊ शकते.  वाहन एका वेळी ४०० किलोग्रॅम पर्यंत सामान फेरी करू शकते. वाहने मॅसर्स आंटोरीओ ड्राइव्ह आणि गियर प्रायव्हेट लिमिटेड, कॅनडातर्फे तयार केली जातात. १८-व्हीलचे वाहन प्रत्येकी ११ लाख रुपये आहे. सध्या दोन उभयचरांची शिल्प अप्रभावित आहे कारण त्यांच्या टायरचे नुकसान झाले आहे आणि बदलण्याची गरज आहे. प्राधिकरण न्यूझीलंडमधील टायर मिळवण्याच्या प्रक्रियेत आहे या वाहनांची देखभाल मुंबई पोलिसांच्या तज्ज्ञांच्या यंत्रमार्फत केली जात नाही कारण ते गोव शिप यार्ड कंपनीला देखभाल कार्यासाठी पाठविले जातात.

रॉकेट लांचर १४

ग्रेनेड प्रक्षेपक (बेरेल + स्वयंचलित अंतर्गत) ३९१

स्निपर रायफल्स ०८

मॉर्टर्स ४४

एसएलआर २९ ३७३

एके-४७- ३९७५

इन्सास रायफल्स ३९१६

मशीन + स्टेन गन ४०००

प्रोजेक्टर ग्रेनेड ७३

कोपरा शस्त्रे शॉट १५

कॉर्ड-डिटोनेटिंग स्फोटक द्रव्ये ४७५

बुलेटप्रुफ हेल्मेट १५००

नाईट विजन दुर्बिण-१४२

लेजर पाईंटर ४५

मार्च २०११ आणि जानेवारी २०१२ मध्ये ४५०० बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी केले.सध्या त्यांची संख्या सुमारे ४६०० झाली आहे. ही अत्याधुनिक शस्त्रे, ज्या केवळ निमलष्करी दलाकडून वापरली जातात, प्रामुख्याने अमेरिका आणि जर्मनीतून खरेदी केल्या गेल्या आहेत. याशिवाय हल्ल्यानंतर तीन हजार विशेष कमांडो पथक पोलिस दलाला मिळाले.

पुढील बातमी
इतर बातम्या