लोकलमध्ये सापडली ५ दिवसांची चिमुरडी

  • मुंबई लाइव्ह टीम & वैभव पाटील
  • क्राइम

चर्चगेट रेल्वे स्थानकात लोकलच्या अपंग डब्यात ५ दिवसांची मुलगी सापडल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. या मुलीच्या पालकांबद्दल अद्याप महिती मिळू शकलेली नाही. दरम्यान पोलिसांनी या पाच दिवसांच्या मुलीसा बॉम्बे रुग्णालयात दाखल केलं आहे.

रेल्वे पोलिसांनी केली चौकशी

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी चर्चगेट स्थानकात लोकलच्या अपंग डब्यात सफेद कपड्यामध्ये गुंडाळलेल्या चिमुरडीला एका प्रवाशाने पाहिलं. त्या मुलीची अवस्था पाहून प्रवाशानं तातडीने (जीआरपी) रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी याबाबतची चौकशी केल्यानंतर त्या मुलीची प्रकृती नाजूक असल्याचं आढळून आलं. दरम्यान पोलिसांनी उपचारासाठी तिला बॉम्बे रुग्णालयात दाखल केलं. मात्र, या मुलीचे पालक कोण? याचा शोध घेण्यासाठी पोलिस चर्चगेट स्थानकातील सीसीटीव्हीची तपासणी करत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या