सायन पनवेल मार्गावर बसचा भीषण अपघात, 5 जखमी

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

मुंबईच्या सायन - पनवेल महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या व्हॉल्वो बसचा गुरुवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

5 जण जखमी

भरधाव वेगात असलेली ही बस मुंबईच्या दिशेने येत होती. दरम्यान चालकाचं सानपाडा रेल्वे स्थानकाजवळ एका वळणावर नियंत्रण सुटलं. त्यामुळे बस थेट डिव्हायडरला धडकून उलटली. त्यावेळी बसमध्ये एकूण 20 प्रवाशी होते. या अपघातात 5 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नवी मुंबईच्या स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रणात आणली.

पुढील बातमी
इतर बातम्या