मुंबईत 50 किलो हशीश जप्त

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)च्या मुंबई शाखेने तब्बल 50 किलो हशीश जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चालक खुर्शीद अहमदसह पीटर फर्नांडिस आणि मोहम्मद आसिफ या तिघांना पकडण्यात आले आहे.

बाजारात या हशीशची किंमत 2 कोटींच्या घरात आहे. हशीशचा साठा जम्मू-काश्मीरवरून मुंबईला आणला जात होता. सोमवारी रात्री मुंबईत मोठा ड्रग्सचा साठा आणला जाणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार मुंब्रा टोल नाक्यावर सापळा रचून जम्मू काश्मीरची नंबर प्लेट असलेल्या एका ट्रकला अडवण्यात आले. त्या ट्रकमध्ये गुप्त कप्पा करून 50 किलो हशीश लपवण्यात आले होते.

दुसऱ्या एका कारवाईत एनसीबीने डोंगरी परिसरातील एका घरावर छापा टाकला. याप्रकरणी सकलेन कुरेशी नावाच्या इसमाला अटक करण्यात आली आहे. या वेळी एकूण 281 कोरेक्स कफ सिरपच्या बाटल्या, 10 ग्रॅम मेफेड्रोन आणि साडे पाच लाख रुपये जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या या कफ सिरपचा नशा करण्यासाठी वापर केला जातो.

पुढील बातमी
इतर बातम्या