६५ वर्षाच्या वृद्धेनेच केली आपल्या नवऱ्याची हत्या

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

एका ६५ वर्षाच्या महिलेने झोपेत असलेल्या आपल्या ७५ वर्षाच्या नवऱ्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून त्याची हत्या केल्याची घटना घाटकोपरमध्ये रविवारी सकाळी उघडकीस आली. छोटेलाल मौर्या असं त्या मृत व्यक्तीचं नाव आहे. पतीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी ६५ वर्षीय महिलेला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे.

संपूर्ण प्रकार 

घाटकोपर परिसरात छोटेलास मौर्या या व्यावसायिकाचे पाच दुकाने आहेत. रविवारी सकाळी मौर्या हे त्यांच्या बिछान्यात बेशुद्धावस्थेत पडले होते. त्यावेळी घरातल्यांनी तातडीनो मौर्या यांना जवळील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मौर्या यांना मृत घोषित केले. मौर्या यांचा झोपेतच नैसर्गिक मृत्यू झाल्याचा गैरसमज अनेकांना झाला.

नियमानुसार मौर्या यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यावेळी मौर्या यांचा मृत्यू नैसर्गिक नसून डोक्याला मार लागल्याने झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून पुढे आलं. त्यानुसार पोलिसात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला. 

तपासादरम्यान मौर्या यांच्या मृत्यूच्यावेळी त्यांची पत्नी ही घरात एकटीच होती. या संशयास्पद मृत्यू प्रकरणी मौर्या यांच्या पत्नीकडे चौकशी केली असता तिने गुन्ह्यांची कबुली दिली. नवऱ्याच्या अनैतिक संबधांना कंटाळून मौर्याच्या पत्नीने झोपेत असलेल्या मौर्या यांच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून त्यांची हत्या कली.

पुढील बातमी
इतर बातम्या