महाराष्ट्रातील 70 वर्षीय महिला पर्यटकावर हॉटेलमध्ये बलात्कार

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले बहुतेक पर्यटक महाराष्ट्रातील आहेत. या घटनेच्या काही दिवसांनंतर, महाराष्ट्रातील एका 70 वर्षीय पर्यटक महिलेवर हॉटेलमध्ये बलात्कार झाला. त्यामुळे पहलगाम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काश्मीरच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या महिलेसोबत ही दुःखद घटना घडली.

ही महिला काश्मीरच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पहलगामला गेली होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हॉटेलच्या खोलीत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. तिला गंभीर शारीरिक दुखापत झाली. तिच्यावर इतक्या क्रूर पद्धतीने बलात्कार करण्यात आल्याचे कळले आहे की ती अनेक दिवस हलूही शकत नव्हती.

आरोपी जुबैर अहमद महिला पर्यटकाच्या खोलीत घुसला. त्यानंतर त्याने महिलेचे तोंड चादरीने बांधले. त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर, तो खोलीच्या खिडकीतून उडी मारून पळून गेला. ही घटना 11 एप्रिल रोजी घडली. आरोपी पहलगामचा स्थानिक रहिवासी आहे. त्याला अटक करण्यात आली आहे आणि तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ६४ आणि ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

27 जून रोजी अनंतनागच्या प्रधान सत्र न्यायाधीशांनी झुबेर अहमदला जामीन देण्यास नकार दिला. न्यायालयाने म्हटले की, गुन्ह्याचे गांभीर्य, चालू तपास आणि उपलब्ध पुरावे लक्षात घेता, या टप्प्यावर जामीन मंजूर केला जाऊ नये.


हेही वाचा

2024 मध्ये मुंबईत सायबर फसवणुकीच्या प्रमाणात वाढ

दोन कुटुंबात हाणामारी, तिघांनी गमावले प्राण

पुढील बातमी
इतर बातम्या