हवाला प्रकरणातील टोळीचा पर्दाफाश

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर हवालासाठी काम करणाऱ्या आठ जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या अटक आरोपींमध्ये ३ महिलांचादेखील समावेश आहे. ही टोळी दुबईतून परदेशी चलनासह इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्याचं दाखवून ते भारतात विकायची.

आरोपींची नावं

या आठ आरोपींमध्ये मुसेफ मोहिनुद्दीन जमादार, मोहम्मद आरिफ मोहम्मद यालिक, जाबीर युनूस शेख, निसार अहमद, सय्यद जावेदअली आयकलअली, मेहमूद कलांदर शेख, पटनी सोहेल अब्दुल रझाक यांचा समावेश आहे.

५ एप्रिल रोजी दुबईला हवालासाठी जाणाऱ्या दहा जणांना पोलिसांनी अटक केली होती. या सर्वांकडून पोलिसांनी अकरा पासपोर्ट, दुबईचे तिकीट आणि व्हिजा जप्त केले. याशिवाय १७.५० लाखाचा यूएई दिराम जप्त केले आहे.

यापूर्वी या टोळीने २७ जणांना तर आतापर्यंत ५७ जणांना दुबईत पाठवलं होतं. हे सर्व तरुण डोंगरी, मानखुर्द, येथील रहिवासी असल्याचं पोलिस तपासात पुढे आलं आहे.

यापूर्वी १५ जणांना अटक

भारतीय चलनाच्या तुलनेत दुबईतील चलन हे जास्त आहे. तसेच दुबईत इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्तात मिळते. या गोष्टीचा फायदा घेऊन ही टोळी एका वेळी दहा ते बारा जणांना बनावट पासपोर्ट बनवून पाठवायची. कुणाला संशय येऊ नये म्हणून या टोळीत महिलांचा देखील वापर केला जायचा. त्यानंतर तेथे सामान खरेदी करून ही टोळी पुन्हा भारतात येऊन ते साहित्य विकायचे. परदेशात खरेदी करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी या सर्वांचे बँकेत खाते उघडून त्यामध्ये एक लाख रुपये प्रत्येकी पाठवण्यात आलं होतं. यापूर्वीही अशा प्रकारे हवाला प्रकरणी १५ जणांना अटक केली होती. या आठ जणांच्या अटकेनंतर आरोपींची संख्या २३ इतकी झाली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या