राज्यात लाँकडाऊनचे उल्लघंन करणाऱ्या 8 हजार जणांवर गुन्हे दाखल

देशात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले असून, याला आळा घालण्यासाठी सरकारने देशांत लॉकडाऊन घोषीत केला आहे. मात्र लॉकडाऊनचा आदेश धाब्यावर बसवून खुलेआम संचारकेल्याप्रकरणी राज्यभरात 8 हजार गुन्हे दाखल करण्यात आले.याशिवाय समाज माध्यमांवर अफवा पसरवल्याप्रकरणी राज्यातील विविध सायबर पोलिसांनी 51 गुन्हे दाखल केले आहेत.

मुंबईत लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणतीही कार्यालये, दुकाने आदी चालविण्यास मनाई होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा किराणा दुकान तसेच अत्यावश्यक सेवांची दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे.  यामुळे नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. या लॉकडाऊनमध्ये समूहाने एकत्र येण्यासही मज्जाव आहे. नागरिकांनी एकत्रित बाहेर पडून संसर्गाची भीती वाढू नये म्हणूनच राज्य सरकारने संचारबंदी लागू केली.  तर हे नियम मोडणाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहिता 188 अंतर्गत कारवाई केली जाते. त्यानुसार पोलिसांकडून शहरात चोख बंदोबस्त ठेवून कायदे मोडणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. राज्यभरात आतापर्यंत कलम 188 अंतर्गत 8 हजार गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

राज्यात आणि मुंबईत करोना हळूहळू हातपाय पसरू लागलेला असताना करोना आणि त्या संदर्भात सरकारकडून केल्या जाणाऱया उपाययोजनांसंदर्भात मोठ्या प्रमाणावर अफवांचे पीक सध्या उठले आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व सायबर पोलि समाजमाध्यमांवरील हालचालींवर लक्ष ठेऊन असून  राज्यातील 51 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मुंबईतही अफवा पसरवल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
...
मुंबईत 1169 जणांवर गुन्हे
लॉक डाऊनच्या काळात नियम तोडल्याप्रकरणी मुंबई पोलिसंनी 1167 व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केला आहेत. तर 991 जणांना अटक केली आहे.105 जणांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. तर 71 जणांचा शोध सुरू आहे.
पुढील बातमी
इतर बातम्या