देवरुख रत्नागिरी ते बोरीवली व्हाया दादरच्या रिया ट्रॅव्हल्स कंपनीच्या बस क्रमांक (एमएच- 04, एफके -7776) ला रविवारी पहाटे 4.30 ते 5 च्या सुमारास अपघात झाला. दादर टीटी परिसरात पहाटे हा भीषण आणि विचित्र अपघात झाला. रत्नागिरीहून बोरीवलीकडे जात असताना रस्त्यावरील दुभाजकावर धडक बसल्याने या बसला अपघात झाला.