हवाला रॅकेट चालवणाऱ्या सराईत आरोपीला अटक

परदेशात नागरिकांना पाठवून हवाला रॅकेट चालवणाऱ्या वाँटेड आरोपीला अटक करण्यात सहार पोलिसांना यश आलं आहे. उस्मान गणी आबूबकर मन्सुरी असं या आरोपीचं नाव असून या गुन्ह्यातील हा ५३ वा आरोपी आहे. यापूर्वी या टोळीच्या ५२ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणातील अन्य दोन मुख्य आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

याचाच फायदा उचलत...

भारताच्या तुलनेत आखाती देशात इलेक्ट्रॉनिक आणि कॉस्मेटिक याशिवाय इतर वस्तूंच्या किंमती स्वस्त आहेत. याचाच फायदा उचलत उस्मान आणि त्याच्या साथीदारांना चित्रपट चित्रीकरणाच्या नावाखाली डोंगरी, मानखुर्द यांसारख्या दुर्गम भागातील नागरिकांना परदेशात पाठवून त्यांना त्या ठिकाणी पैसे पुरवून खरेदी करण्यास सांगायचे. तसंच खरेदी केलेल्या त्या वस्तू भारतात आल्यानंतर त्यांच्याकडून परत घेऊन त्यांची विक्री करून पैसे कमवायचे. या प्रत्येक फेरीमागे या नागरिकांना मोबदला स्वरुपात पैसे देण्यात येत होते.

टोळीतील ११ जणांना अटक

या सक्रीय टोळीची माहिती काही महिन्यांपूर्वी पोलिसांना मिळाल्यानंतर या टोळीच्या ११ सदस्यांना पोलिसांनी सहार विमानतळावरून अटक केली. त्याच्या चौकशीतून अनेकांची नावं पुढे आली. त्यात उस्मान या टोळींना संभाळत असल्याचं पुढे आल्यानंतर पोलिस त्याच्या शोधात होते. दरम्यान उस्मान परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना शनिवारी त्याला पोलिसांनी विमानतळावर बेड्या ठोकल्या. या प्रकरणातील उस्मान हा महत्त्वाचा आणि ५३ वा आरोपी आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या