धुलीवंदनाच्या दिवशी इतक्या जणांवर वाहतूक पोलिसांनी केली कारवाई

होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी शहरामध्ये दारुच्या नशेत गाड्या चालविणाऱ्यांवर मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने कारवाईचा बडघा उगारला आहे. पोलिसांनी काल मध्यरात्रीपर्यंत तब्बल ५हजार ३२६जणांवर कारवाई केली आहे. त्यात ५४० मद्यपान करून, वेग मर्यादा ओलांडणारे १२८५ , ट्रीपल सीट ३०८६ आणि विना हँल्मेट ३ हजार ०८६वाहन चालकांवर कारवाई केली आहे.

शहरात रंगपंचमीच्या दिवशी रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून मुंबई पोलीस आणि वाहतूक विभागाने विशेष काळजी घेतली आहे.नाक्यांनाक्यावर बंदोबस्त आणि नाकाबंदी वाढवण्यात आली असून वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालवणाऱ्यावत कारवाईचा बडगा उगारला आहे. रंगपंचमीचा सण जल्लोषात साजरा सुरू असताना काही वाहनाचालक वाहतुकीचे नियम मोडून सर्रास मद्यप्राशन करून शहरात वाहन चालवत असतात, या मुळे अपघात होण्याची शक्यता असते. या रंगाच्या सणाचा बेरंग होऊ नये म्हणून मुंबई पोलिस आणि वाहतूक विभागाने विशेष काळजी घेतली आहे. मुंबईच्या रस्त्यावर पोलिसाच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून नाकाबंदी वाढवण्यात आली आहे, तसेच वाहतूक विभागाने देखील रस्त्यावर मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या तळीरामावर धडक कारवाई सुरू केली आहे. मद्यप्राशन करून आणि वाहतुकीचे नियम मोडणार्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली असून विशेष करून दुचाकीस्वारांना अडवून त्याची मद्य तपासणी करण्यात येत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या