जिया खान मृत्यूप्रकरणात सूरज पांचोली निर्दोष

अभिनेत्री जिया खान (Jiha khan) मृत्यू प्रकरणात सूरज पांचोलीची (Sooraj Pancholi) निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्यांअभवी सूरजची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कोर्टानं जियाची आई राबिया खान यांचा अर्ज फेटाळला असून निकालाल आव्हान देण्याची मुभा मात्र कायम ठेवली आहे.  

10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर विशेष सीबीआय न्यायालयाने अभिनेता सूरज पांचोलीला जिया खान मृत्यूप्रकरणात निर्दोष घोषित केलं आहे.

सूरज पांचोलीवर बॉलिवूड अभिनेत्री जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप  करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास आधी मुंबई पोलीस करत होते आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.


पुढील बातमी
इतर बातम्या