अजमेर बॉम्ब स्फोटातील आरोपी डॉ. जलीस अन्सारी मुंबईतून फरार

राजस्थानच्या अजमेर येथील बॉम्ब स्फोटात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला दहशतवादी डॉ. जलीस अन्सारी हा पॅरोलवर असताना फरार झाला आहे. मुंबईतील आग्रीपाडा येथीस मोमीनपाडाच्या बीआयटी चाळीत तो कुटुंबियांसोबत रहात होता. तो बेपत्ता असल्याची तक्रार मुंबईच्या आग्रीपाडा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.

एकेकाळी मुंबई महानगरपालिकेत डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या जलील अन्सारीने बाबरी मशिदीचे पतन झाल्यानंतर करीम तुंडाच्या संपर्कात येऊन नव्वदच्या काळामध्ये पाकिस्तानमध्ये जाऊन बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर बॉम्ब बनवण्यामध्ये हुशारकी मिळवली. १९९२ साली राजस्थानच्या अजमेर बाँम्बस्फोट घडवून आणला होता. अजमेर ब्लास्टमधील त्याचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाने त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

नुकताच ६८ वर्षीय जलील २१ दिवसांचा पॅरोलवर बाहेर आला होता. पॅरोल मंजूर झालेल्या अन्सारीला दर दिवशी मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनध्ये हजेरी देण्याच्या अटीवर पॅरोल मंजूर करण्यात आला होता. मात्र १६ जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता घरातून नमाज पठण करण्यासाठी जात असल्याचे सांगून तो अचानक गायब झाला. अन्सारीचा शोध न लागल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी मुंबईतील आग्रीपाडा पोलिस ठाण्यांमध्ये तो गायब झाल्याची तक्रार नोंदवली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जलील अन्सारी याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या