मुंबईत बालकामगार विरोधी मोहीम

भारतात 30 एप्रिल बाल कामगार प्रतिबंध दिवस म्हणून पाळला जातो. याचेच औचित्य साधत मुंबई पोलीस,कामगार विभाग आणि 'प्रथम' या संस्थेतर्फे मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यांत बालकामगार या विषयावर जनजागृती करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

साकीनाका पोलीस ठाण्यातर्फे नागरिकांना आणि व्यवसायिकांना बाल कामगार न ठेवण्याची शपथ देण्यात आली. तसेच यावेळी मुंबईतून अनेक बालकामगारांची सुटका करून त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले. बाल कामगार कामावर ठेवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येत असून, अनेक जणांवर गुन्हेही नोंदवण्यात आले आहेत. मात्र नुसते गुन्हे नोंदवून, दंडुका दाखवून बाल कामगारांचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच मुंबई पोलीस , कामगार विभाग आणि प्रथम संस्थेच्या माध्यमातून जनजागृती करत बाल कामगार न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या