एटीएम लुटण्याचा प्रयत्न पोलिसांमुळे अयशस्वी

मुंबईतल्या दहिसर परिसरात अँक्सीस बँकेचे एटीएम लुटण्यासाठी आलेल्या तीन सराईत आरोपींना पकडण्यात दहिसर पोलिसांना यश आलं आहे. झैद कोरडीया (२४), अनिल जनधोत्रे (२५), वाहिद शेख (२४),  अशी या आरोपींची नावे आहेत. घातक शस्त्रांच्या मदतीने एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड घेऊन पसार होण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न गस्तीवरील बीट मार्शलच्या धाडसामुळे उधळला गेला.

 दहिसर पूर्वच्या केतकीपाडा परिसरात अँक्सीस बँकेचे एटीएम मशीन बसवण्यात आले आहे. या मशीनवर सीसीटिव्ही कॅमरे असल्यामुळे बँकेकडून सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेला नाही. याच संधीचा फायदा घेऊन आरोपींनी घातक शस्त्रांच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड घेऊन पसार होण्याचा कट रचला. त्यानुसार शुक्रवारच्या मध्यरात्री आरोपी   झैद कोरडीया (२४), अनिल जनधोत्रे (२५), वाहिद शेख (२४), सोबत फरार आरोपी अमर गुजमुले उर्फ जलवा, गणेश पटेल उर्फ राकु हे लोखंडी राँड, चाकू, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, हातोडी, कोयता, रस्सी बँटरी घेऊन मशीन तोडत होते.

त्यावेळी दहिसर पोलिस हे रात्रीच्यावेळी गस्त घालत असताना. त्यांना एटीएम मशीनजवळ घुटमळत असलेल्या दोन व्यक्तींवर संशय आला. पोलिसांनी त्यांना हटकले असता. आरोपी अमर गुजमुले उर्फ जलवा, गणेश पटेल उर्फ राकु हे पळून गेले. मात्र  झैद कोरडीया (२४), अनिल जनधोत्रे (२५), वाहिद शेख (२४), हे पोलिसांच्या हाथी सापडले. या आरोपींवर पोलिसांनी ३९९, ४०२ भा.द.वि कलमांसह ३७(१), अ भारतीय हत्यारबंदी कायदा १३५ मु.पो.का अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली आहे. या प्रकरणी दहिसर पोलिस अधिक तपास करत असून फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या