पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रिक्षाचालकाला धक्का देत त्याच्या खिशातील मोबाइल जबरीने चोरल्याची घटना रविवारी सायंकाळी चेंबूरच्या कलेक्टर कॉलनीमध्ये घडली आहे. येथील शिवशक्तीनगर परिसरात राहणारा विकास समुद्रे (25) हा रिक्षाचालक नेहमीप्रमाणे याच परिसरात रिक्षा पार्किंग करून घरी जात होता.